सोमवारपासू पावसाळी अधिवेशन, विराेधक फडणवीस सरकारला घेरण्याच्या तयारीत

0
10

मुंबई, दि. १७ : कोर्टाने ताशेरे ओढले असताना पण सर्व घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिन चिट दिली. आप खाते रहो, मै बचाता रहूंगा..! अशी व्याख्या फडणवीस सरकारने सुरू केली आहे. गंभीर आरोप असताना, चौकश्या सुरू असताना मंत्रीमंडळात समावेश करून मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेचा कडेलोटचं केला आहे. असा घाणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला घेतलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन साेमवारपासून सुरू हाेत अाहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावळ, गिरीश बापट आदी मंत्र्यांविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या अाराेपावरून फडणवीस सरकारला घेरण्याची विराेधकांनी तयारी केली अाहे. तर आपल्या नव्या मंत्र्यांच्या मदतीने विरोधकांचा सामना करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सज्ज अाहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चातुर्याने अधिवेशनाच्या ताेंडावर मित्रपक्षांना मंत्रिपदे देऊन महायुतीतील खदखद शांत करण्याचा प्रयत्न केला. शिवसेेनेच्या दाेन राज्यमंत्र्यांचाही विस्तारात समावेश अाहे. खरे तर नूतन राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांचे राजकीय वैर सगळ्यांनाच ठाऊक आहे. अधिवेशनात गुलाबराव नेहमीच खडसे यांना कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करीत असत. मात्र आता गुलाबरावांना मंत्री असल्याने व खडसे परिषदेत नसल्याने दाेघांचीही जुगलबंदी अनुभवता येणार नाही. दुसरीकडे सदाभाऊ खोत, राजू शेट्टी यांनाही मंत्री बनवून विधिमंडळात सगळे आलबेल कसे राहील याचीही काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. नव्या मंत्र्यांना रविवारी मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार असून सभागृहात विरोधकांना कशी उत्तरे द्यावीत, याचे प्राथमिक धडेही देणार आहेत.
काँग्रेसने नारायण राणे यांना विधान परिषदेत पाठवून भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. नारायण राणे अभ्यासू असून मुद्देसूद बोलतात आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडतात. परंतु या वेळी नारायण राणे भाजपवर नव्या आयुधांनिशी चढाई करणार की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांचीच पुनरावृत्ती करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.