आमदार सावळांकडून मराठी राजभाषेसाठी ठराव

0
8

वृत्तसस्था
पणजी, दि. 19 – मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव मांडण्याचे ठरविले आहे. ठरावाची प्रत त्यांनी काल मंगळवारी सरकारच्या विधिमंडळ खात्यास सादर केली.

सावळ यांनी यापूर्वी मराठी राजभाषेबाबतचे खासगी विधेयक विधिमंडळ खात्यास सादर केले होते. खात्याने त्यावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी हे विधेयक अगोदर कायदा खात्याकडे पाठवले. तिथून अजुनही त्या विधेयकाची सुटका झालेली नाही. विधेयकाची प्रत कायदा खात्याकडेच आहे. यामुळे सावळ यांनी यावेळच्या अधिवेशनात ठराव मांडावा असा निर्णय घेतला व त्याविषयीची नोटीस मंगळवारी दिली. आपला ठराव कसा असेल ते सावळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी ठरावाची प्रतच विधिमंडळ खात्याला सादर केली आहे.