गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे वेतन सुरु करणार – विनोद तावडे

0
10

मुंबई, दि. 21 : राज्यातील अनुदानप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्याची कार्यवाही वित्त व नियोजन विभागामार्फत सुरु आहे. येत्या गणेशोत्सवापूर्वी या शाळांमधील शिक्षकांना त्यांचे 20 टक्के वेतन अनुदान मिळेल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्यास विलंब झाल्याबाबतचा प्रश्न सदस्य सर्वश्री ना.गो.गाणार, अनिल सोले आदींनी उपस्थित केला होता. अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना 20 टक्क्यांप्रमाणे 19247 शिक्षक व शिक्षकेतर पदांना सुमारे 163 कोटी इतक्या रकमेची मंजूरी देण्यात आली आहे. शिक्षकांचा पगार योजनेतर आणि योजनाबाह्य नियोजनातून देण्याबाबत विचार आहे. शिक्षकांना फक्त याचवर्षी नव्हे तर पुढील वर्षीपासून कायमस्वरुपी वेतन मिळेल त्यादृष्टीने ठोस
नियोजन करण्यात येणार आहे, असेही, श्री. तावडे यांनी सांगितले.