गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाला 500 खाटांच्या रुग्णालय मंजूर

0
8

मुंबई, दि. 21 : गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2016-17 साठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी व 500 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

हे महाविद्यालय नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास संलग्न असेल. केंद्र शासनाने दिलेली परवानगी ही सन 2016-17 वर्षाकरिता असून तद्नंतर सदर परवानगीचे दरवर्षी नूतनीकरण करुन घेणे क्रमप्राप्त आहे. संस्थेने त्यानुसार विद्यार्थी प्रवेश
करण्यापूर्वी केंद्र शासनाच्या तसेच त्या आधारे राज्य शासनाच्या परवानगीचे नूतनीकरण करुन घेणे बंधनकारक राहील, असे शासन निर्णयात नमूद आहे.