भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून CM यांचे विरोधकांना चिमटे

0
14

मुंबई- भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यात रान पेटले आहे. पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी याच मुद्यावरच जास्त जोर दिला आहे. विरोधकांनी भाजपच्या नेत्यांवर भ्रष्‍टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) विधीमंडळात निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनातून विरोधकांना चिमटे घेतले. तसेच भ्रष्‍टाचाराच्या मुद्द्यावरून पेटलेले रान विझवण्याचा प्रयत्नही केला.

पारदर्शी कारभारासाठी जनतेने भाजपला निवडून दिले आहे. पुरावे नसताना विरोधकांनी हवेत बाण मारु नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. लोकायुक्तांकडून एकनाथ खडसे यांना क्लीनचीट ‍मिळाली आहे. त्याचप्रमाणे गिरीश महाजन यांच्यावरील आरोप देखील मुख्यमंत्री यांनी खोडून काढले. रस्ते घोटाळ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करू, असे आश्वासन मुख्यंत्र्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, तत्पूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या चर्चेत भाग घेतला. खडसेंनी यावेळी त्याच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोड़ून काढले. आपल्यावर खोटेनाटे आरोप झाले. पण आपल्या विरोधात पुरावे नसताना राजीनामा द्यावा लागला, याचे मोठे दु:ख होत असल्याची खंत खडसेंनी यावेळी व्यक्त केली. आज माझ्यावर ही वेळ आली आहे, उद्या ती तुमच्यावर येणार असल्याचा इशारा त्यांनी सभागृहातल्या उपस्थित सदस्यांना दिला.