पुरात वाहून गेलेल्या तिघांचा जीव वाचला

0
16

कार वाहून गेली : एक तास मृत्यूशी झुंज;सितेपार पुलावरील घटना
गोंदिया(पांढरी),दि.२२ : मुसळधार पावसामुळे सितेपार नाल्याला आलेल्या पुरात कार वाहून गेली. गावकèयांच्या सतर्कतेने कारमध्ये बसलेल्या तिघांचा जीव वाचला. ही घटना गुरुवारी(ता. २१) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
सुंदर शर्मा (वय ४०), वंश शर्मा (वय ५) दोन्ही रा.खंदाळ पो.गोबरवाही ता.तुमसर,बाबुराव शेंडे (वय ५०रा. सोनेगाव, पो.सिहोरा, ता.तुमसर, जि.भंडारा) हे तिघेजन मारूती( एमएच३६,५१०२) ने पांढरीला येत होते. दरम्यान सितेपार नाल्याला पूर आले होते. वाहन पुल पार करून दुसèया काठावर जाईल, या बेताने चालकाने वाहन पुलावरून नेले. त्यावेळेस पुलावरून पाच फूट पाणी वाहून जात होते. थोड्या वेळाने कार पुलावरून खाली कोसळली व ३०० मिटर वाहत जाऊन पुराच्या मधोमध झाडांना अडली. यातून बाबुराव शेंडे कसेबसे बाहेर आले. आपले सोबती पुरात वाहून गेल्याने त्यांनी आरडाओरड केली. तो पर्यंत चालक सुंदर शर्मा आपल्या लहान मुलाला घेवून वाहनाच्या छतावर चढले. मदतीकरिता कुणीतरी आवाज देत असल्याचे ऐकून प्रल्हाद दामा कोसरे, रामकृष्ण बोरकर, मंगला बोरकर, छोटी कोसरे, विनायक मेश्राम, डिगंबर वैष्णव यांनी घटनास्थळावर पोहोचून बचावकार्य सुरू केले. तासाभराच्या बचावकार्याला यश आले.माहिती मिळताच डुग्गीपारचे ठाणेदार राजकुमार केंद्रे, नायब तहसीलदार मेश्राम, तलाठी कुंभरे, पोलिसमित्र सल्लू पठाण यांनी घटनास्थळी पोचले.