अॅट्रोसिटी कायद्याला पर्याय शोधायला हवा-राज ठाकरे

0
11

विशेष प्रतिनिधी
अहमदनगर,दि.25 – बलात्कारासारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी शरीयतसारखा कायदा देशामध्‍ये लागू करण्याची गरज आहे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्‍यक्‍त केले आहे. त्‍यांनी कोपर्डीतील बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याला पर्याय शोधला पाहिजे असे त्‍यावेळी ठाकरे म्हणाले.
बलात्कार करणाऱ्यांचे हातपाय तोडले पाहिजेत,असे म्हणत केवळ शस्त्र परवाने देऊन उपयोग नाही, कायद्याचा धाक निर्माण करा,असा टोला मुख्यमंत्र्यांना हाणला.
शासन बदलले आहे हे लोकांना कळू द्या त्‍याची जाणीव होऊ द्या.रविवारी मुख्यमंत्र्यांनी कोपर्डीला भेट देऊन निर्भयाच्या कुटुंबीयांचं सांत्वन केले. संबंधित कुटुंबाला शस्त्र परवाना देण्याचे आश्वासनही मुख्‍यमंत्र्यांनी दिले होते.