जादुटोण्याच्या संशयातून मारहाण झाल्याने महिलेची आत्महत्या

0
8

गोंदिया, दि. २५ – जादूटोण्याच्या संशयातून आदिवास दांपत्याला एका कुटुंबाने माराहणा केल्यानंतर पीडित महिलेने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली या गावी एका आदिवासी दाम्पत्याला गावातील एका कुटुंबाने जबर मारहाण केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने आणि मारहाण करणा-यांच्या दहशतीमुळे महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गावक-यांनी पोलिसांच्या भूमिकेवर रोष व्यक्त करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे.