गुजरातमध्ये टोलमुक्ती जाहीर, महाराष्ट्रात कधी ?

0
8

अहमदाबाद (वृत्तसंस्था)- गुजरातमध्ये कार आणि छोट्या वाहनांना १५ ऑगस्टपासून टोलमुक्ती जाहीर करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. आता महाराष्ट्रात टोलमुक्ती कधी होणार? हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
भाजपाने महाराष्ट्रात निवडणुकीआधी टोलमुक्तीची आश्वासने दिली पण अजूनही झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारला जनतेच्या टीकेला समोरे जावे लागत आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील १२ टोलनाके कायमचे बंद आणि ५३ टोलनाक्यांवरुन छोट्या वाहनांना सूट दिली. मात्र सरसकट टोलमुक्ती करण्यात आलेली नाही