यापुढे कुटुंबातील इतर सदस्यांना जात पडताळणीची गरज नाही- ना. बावणकुळे

0
12

कुटुंबात कोणत्याही सदस्याचे जात वैधताप्रमाणपत्र असल्यात ते ग्राह्य धरणार

लवकरच शासनाचे परिपत्रक येणार

नागपूर (ता.7)- नोकरी, शिक्षण तसेच सार्वत्रिक निवडणुक लढवायची असल्यास मागास जातीतील नागरिकांना आपल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी ही जात पडताळणी समिती कडून आवश्यक आहे. यासाठी मागासवर्गीय समाजातील लोकांनी खुप मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागतो. कधीकधी तर वेळेवर पडताडणी झाली नाही, तर अशा कुटुंबाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्या विचारात घेत राज्य शासनाने जात पडताडणीच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे ठरविले आहे. यापुढे कुटुंबातील एकाही सदस्याकडे जातवैधता प्रमाणपत्र असल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांना जात पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. याविषयी लवकरच शासनाचे परिपत्रक येणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जामंत्री ना. चंद्रशेखऱ बावणकुळे यांनी नागपूर येथे बोलताना केली.
ते नागपूर येथील धनवटे नेशनल कॉलेज येथे आयोजित ओबींसींच्या राष्ट्रीय महाधिवेशनात बोलत होते.