गोंदिया व तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी

0
8

नागपूर, दि. ६ : नागपूर विभागात आज सकाळी आठ वाजेपर्यंत २६.१८ मिमी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १५५.०० मिमी., आणि तिरोडा तालुक्यात ९३. ७० मिमी. एवढी अतिवृष्टी झाली आहे.
नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्यात ६८.६१., गडचिरोली जिल्ह्यात २२.५६ मिमी., भंडारा जिल्ह्यात ३३.७४ मिमी., नागपूर जिल्ह्यात १६.६६ मिमी., वर्धा जिल्ह्यात सरासरी ८.६३., मिमी., तर चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी ६.९० मिमी., सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
दिनांक १ जून २०१६ ते ६ ऑगस्ट २०१६ पर्यंत नागपूर विभागात ७६३.५८ मिमी. इतका सरासरी पाऊस पडला आहे.