देवरीच्या ठाणेदारपदी राजेश तटकरे

0
9

देवरी,8- देवरीचे ठाणेदार राजेद्र तिवारी यांचे ठाणे शहर येथे स्थानांतर झाल्याने नक्षलसेलचे प्रभारी राजेश तटकरे यांनी देवरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून आज मध्यान्हानंतर कार्यभार सांभाळला आहे.

राजेद्र तिवारी यांनी देवरीचे ठाणेदार म्हणून सुमारे अकरा महिने कामकाज पाहिले. त्यापूर्वी ते लगतच्या चिचगडचे ठाणेदार म्हणून कार्यरत होते. श्री तिवारी यांची ठाणेशहर येथे नुकतेच स्थानांतर करण्यात आले.
आज सोमवारी श्री तिवारी यांना पोलिस सभागृहात पोलिस पाटील संघटना आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त ठाणेदार राजेश तटकरे हे होते. श्री. तिवारी यांचा सपत्नीक शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी देवरी ठाणेहद्दीतील सर्व पोलिस पाटील, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.