देवरीत गणित संबोध परीक्षा

0
13

देवरी,०8- महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय गणित संबोध परीक्षेचे आयोजन देवरी येथे रविवारी (ता.7) करण्यात आले होते.
स्थानिक मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक शाळा या परीक्षाकेंद्रावर सदर परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्रावर तालुक्यातील पाचवी आणि आठवीच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
संचलन तालुका प्रभारी राजेंद्र मोहुर्ले, ब्लॉसम पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक सुजित टेटे, गेडाम सर, थोटे सर, विश्वप्रित निकोडे आणि हर्षदा चारमोडे यांनी केले.