होय, त्या रकमेत अनियमितता, शिक्षा भोगण्याची तयारी : सहकारमंत्री

0
40

उस्मानाबाद,दि.18:  नगरपालिका भरारी पथकाने लोकमंगल ग्रुपच्या पकडलेल्या 91 लाखांच्या रोकडप्रकरणी, सहकारमंत्री सुभाष देशमुखांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. कारण या पैशाचा हिशेब देताना, सहकारमंत्री रोज नव-नवी कारणे देत आहेत.उमरग्यात ‘लोकमंगल’ ग्रुपची जी 91 लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केली होती, त्यात अनियमितता असल्याची स्पष्ट कबुली सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. इतकंच नव्हे तर हा त्याबद्दल असलेली शिक्षाही आपण भोगायला तयार असल्याचे देशमुख म्हणाले.

उमरग्यामध्ये 16 नोव्हेंबरला देशमुख यांच्या लोकमंगल समुहाची 91 लाख 50 हजारांची रोकड उस्मानाबादच्या नगरपालिका भरारी पथकानं जप्त केली. ज्यामध्ये एक हजाराच्या जुन्या नोटा होत्या. मात्र ही ऊसतोडणी कामगाराच्या टोळीला देण्यासाठी होती, असा दावा सुभाष देशमुख यांनी केला.

विशेष म्हणजे ही रोकड लोकमंगलमधून 5 तारखेला काढण्यात आली होती. त्यामुळं नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही रोकड पुन्हा बँकेत जमा करणं आवश्यक होतं. मात्र तसं न करता ही रोकड ऊसतोड कामगारांना वाटण्यासाठी नेली जात असल्याचा दावा लोकमंगलनं केला होता.