ओबीसीनो संवैधानिक अधिकारासाठी पेटून उठा-डॉ. बोपचे

0
15
गोंदिया- जाती व राजकीय पक्षाचे बंधन झुगारून सर्व ओबीसी बांधवानी आपल्या संवैधानिक अधिकारासाठी पेटून उठा व ८ डिसेंबरला विधान सभेवर आयोजित ‘हा‘मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी होवुन आपल्या एकजुटीचे प्रदर्शन करा, असे आवाहन ओबीसी संघर्ष कृती समितीचे गोंदिया जिल्हा राजकीय समन्ययक व माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी  गोंदिया  येथील दोसा हट मध्ये आयोजित आढावा सभेला संबोधित करताना केले.
२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित जनचेतना अभियान तसेच ८ डिसेंबरच्या महामोर्च्याच्या अनुसंगाने झालेल्या तयारीच्या संदर्भात गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष समिती अंतर्गत ओबीसी संघर्ष समितीचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, ओबीसी सेवा संघाचे पदाधिकारी यांच्या आढावा सभेला जिल्हाअध्यक्ष बबलू कटरे,माजी जि.प.अध्यक्ष नेतरामभाऊ कटरे,खेमेन्द्र कटरे, शिशिर कटरे,मनोज नागरिकर,राजेश नागरिकर,दुलीचंद बुद्धे,बंटी पंचबुद्धे व इतर पदाधिकारी प्रामुख्याने  उपस्थित होते.
सर्वप्रथम जनचेतना रॅली व ८ डिसेंबरच्या  या मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी , सालेकसा, आमगांव,सडक अर्जुनी व तिरोडा या तालु्क्यातील पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात केलेल्या कार्यवाही व पूर्व तयारीची माहिती दिली. उद्या अर्जुनी मोरगांव येथून सुरू होणार्या जन चेतना रॅलीच्या प्रसंगी जिल्हा ओबीसी संघर्ष समिती व तालुका पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे यांनी केले. या संदर्भात तयार करण्यात आलेले पाम्पलेट,पोस्टर तसेच बॅनर, होर्डिगंचे ही सर्व तालुक्यांना वितरण करण्यात आले. या प्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष नेतरामभाऊ कटरे व ओबीसी सेवा संघाचे दुलिचंद बुद्धे यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले व आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येणाऱ्या  ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा महत्वाचा दुआ ठरणार असल्याचे सांगितले. या आढावा सभेला किशोर तरोणे,कैलाश भेलावे,लक्ष्मण नागपूरे, राजू चांदेवार,काशीवार हुकरे,नविन नशिने,राजू पटले,बाबा बहेकार,नरेन्द्र रहांगडाले, तिर्थराज उके,गणेश बरडे,मनोज शरणागत, सुरेश भदाडे,डॉ.शंशाक डोये,ललित बाळबुद्धे, दिलीप गभने,आशिष बारेवार,योगेश हिंगे,सावन डोये,चंद्रकुमार बहेकार,सोहन क्षिरसागर, रेखलाल टेंभरे,प्रमोद लांजेवार,डॉ.विवेक मेंढे,मोहन वडतकर,शैलेश बहेकार,एच.एच.पारधी,अनिल देशमुख,विनोद चौधरी,विष्णु नागरीकर,आशिष नागपूरे,सुनिल पटले,मनोज डोये,विजय फुंडे,लीलाधर गिरीपूंजे,मोरेश्वर हत्तीमारे, कृष्णा ब्राम्हणकर,भरत शरणागत,दिलीप चव्हाण,कमल हटवार,ओम पटले,राजेश पेशने,दिनेश हुकरे,लिलेश्वर रहांगडाले,गिरीष बागडे,संतोष बुकावन,बालु बडवाईक,खुशाल कटरे तसेच सर्व तालुक्याचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.