प्रेरणादायी ठरतोय नानव्हा

0
8

गोंदिया दि.25:: सालेकसा तालुक्यातील नानव्हा हे गाव इतर गावातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. एकात्मक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमानंतर जलयुक्त शिवार अभियानामुळे नानव्हा ह्या गावात हरितक्रांती आली.

सन २०११-१२ मध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत नानव्हा गावाची निवड झाली. गावात वळणदार बांध, २ शेत तळी, २०.४० हेक्टर जमीन समतळीकरण, भात खाचर पुनर्जीवन व एक सीमेंट नाल्याचे बांधकाम करण्यात आले. या गावात यापूर्वी पाण्याची टंचाई होती. शेतीसाठी पाणी मिळत नव्हते.

गावात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी गोंदियाच्या श्री गणेश ग्रामीण संस्थाच्या विशेषज्ञांनी सिमेंट नाल्याची तांत्रीकदृट्या तपासणी करून या त्याची निवड केली. निवड झालेल्या या ठिकाणी ११ मीटर लांब व उंचीचा तसेच १.५ मीटर पाणी क्षमता साठविणारा सिमेंट बंधारा तयार करण्यात आला.

या बंधाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. सिमेंट नाला बांधकामामुळे एक कि.मी. परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. सोबतच आजूबाजूच्या विहीरींची व बोरवेलची पाण्याची पातळी वाढली आहे. रबी पिके १० ते १५ एकरात घेतली जाणार आहेत.