नागपुरातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला

0
7

नागपूर,दि.२७– येथील खुल्या कारागृहातून एका कैद्याने सोमवारी दुपारी पलायन केले. शमाल शिसवाह (40) असे पलायन केलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याला कामासाठी बाहेर काढण्यात आले होते. याचा फायदा घेत शमाल शिसवाह याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. नागपूर पोलिस दुपारपासून त्याचा शोध घेत आहे.शमालला जन्मठेपचा शिक्षा झाली आहे. 2007 मध्ये त्याला कोर्टाने भादंवि कलम 302 नुसार त्याला जन्मठेप सुनावली होती. 2016 मध्ये जानेवारी महिन्यांत शमाल याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून नागपूर येथील खुल्या कारागृहात रवानगी करण्‍यात आली होती.