नागौरीसह 11 दहशतवाद्यांना जन्मठेप

0
15

वृत्तसंस्था इंदूर दि.२७- सिमीचा म्होरक्या सफदर नागौरीसह कमरुद्दीन नागौरी उर्फ राजू, सिबली, साबिर, अंसारी, यासीन, हाफिज हुसैन, अहमद बेग, शमी, मुनरोज आणि खालिद अहमद यां 11 दहशतवाद्यांना इंदूरच्या स्पेशल कोर्टने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नागौरी आणि त्याच्या साथीदारांवर देशद्रोह आणि अवैध शस्त्र बाळगण्याचा आरोप होता. या सर्वांना मार्च 2008 मध्ये श्यामनगर येथून अटक करण्यात आली होती.स्पेशल कोर्टचे जज बी. के. पलौदा यांनी सोमवारी सर्व आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.मागील शुक्रवारी सरकारी वकील विमल मिश्रा यांनी नागौरीसह सर्व आरोपींना 334 प्रश्न विचारले होते. त्यानंतर कोर्टाने 27 फेब्रुवारी रोजी निर्णय देण्याचे म्हटले होते.स्पेशल कोर्टने नागौरीसह सर्व 11 आरोपींना कलम 124 अंतर्गत देशद्रोही करार दिला.इंदूर आणि धार पोलिसांनी 27 मार्च 2008 रोजी सिमीच्या 17 दहशतवाद्यांना इंदूरच्या माणिकबाग येथील श्यामनगर येथून अटक केली होती.त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडला होता. त्यासोबतच नकाशे, देशविरोधी साहित्य होते.या सर्वांना चोरल येथील एका फार्म हाऊसमध्ये ट्रेनिंग दिले जात होते.सफदर नागौरी हा स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) चा प्रमुख होता. नागौरीचे नेटवर्क फक्त भारतापूरते नव्हते तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची संघटना अॅक्टिव्ह होती.अंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदा आणि पाकिस्तानच्या जमायते इस्लामीच्या तो संपर्कात होता.नागौरी हा उज्जैन जवळील महिदपूर येथील रहिवासी आहे. त्याने मास कॉम केले होते. उज्जैन मधील विक्रम विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना त्याने काश्मिर मुद्द्यावर ‘बर्फ की आग’ शिर्षकाखाली शोधनिबंध लिहिला होता.साहिद बद्र फलाही याच्या जागेवर त्याची सिमीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर सिमीचे नाव मुंबई आणि अजमेर बॉम्बस्फोटासोबत जोडले गेले होते.नागौरी गटाने कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील अणु प्रकल्प उडवण्याचा कट रचला होता. त्याच्यासोबत पकडण्यात आलेला सिबली आणि हाफिज दोघे बीटेक होते.