देशी-विदेशी दारु, लॉटरी महागणार

0
14

मुंबई, दि. 18 – राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पामध्ये देशी-विदेशी दारु आणि साप्ताहिक लॉटरीवर करवाढ केली आहे. त्यामुळे राज्यात दारु, लॉटरी आणखी महाग होणार आहे. 2017-18मध्ये 4511 कोटी महसुली तूट अंदाजित आहे.
कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी स्वाईप मशीन स्वस्त होणार.
दूध परीक्षण कीटवरील कर माफ.
सॉईल टेस्टिंग कीट होणार स्वस्त.
मधुमक्षिका प्रक्रिया उद्योगावरचा 2015-16 पर्यंतचा कर माफ.
अर्थसंकल्पात शहरीभागासाठीही काही महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. ज्याअतंर्गत मेट्रो, स्मार्ट सिटी प्रकल्पाला चालना देण्यात येईल.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाइन्फ्रा ही संस्था स्थापन केली जाणार.
– मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटींची तरतूद.
– स्मार्ट सिटी योजनेसाठी 1600 कोटी रुपयांची तरतूद.
– पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार घरं शहरी भागात बांधणार.
– मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागासाठी 25 कोटींची तरतुद.
– युवकांसाठी प्रमोद महाजन कौशल्य केंद्र उभारणार.
– स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटींची तरतूद.
– महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांचा निधी उपलब्ध केला जाईल.
– पुढील 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प.
-अंगणवाडी बालकांना पोषक आहारासाठी 310 कोटींची तरतूद.
– अल्पसंख्यांक उमेदावारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी 8 कोटींची तरतूद.
– शामराव पेजे कुणबी विकास महामंडळासाठी 200 कोटींची तरतूद.
– वनक्षेत्रात पर्यटन प्रोत्साहनासाठी 80 कोटींची तरतूद