राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

0
8

मुंबई, दि. 22 – रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणा-या मारहाणी विरोधात संप पुकारलेल्या निवासी डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. आज रात्री आठ वाजल्यापासून कामावर रुजू होणार आहेत.
राज्यभरातील रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 1100 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आल्यानंतर निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी असणारे सुरक्षा रक्षक हे 21 ते 24 वयोगटातील असणार आहेत.
याआधी दुपारी राज्य सरकारकडून आज रात्री आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांच्या पगार कापला जाईल, असा इशारा निवासी डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आला होता.