गोंदिया जिल्ह्यात ओबीसी सदस्यता नोंदणी धडाक्यात सुरू

0
15

गोंदिया,दि.11-क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज मंगळवारी (दि.11) संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानाला धडाक्यात सुरवात करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र या अभियानाला अोबीसी समाजबांधवांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान, पहिल्याच दिवसी पाच हजारावर ओबीसींनी या अभियानात स्वयंस्फुर्त नोंदणी केल्याचे वृत्त आहे.
गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधत आज ११ एप्रिल रोजी ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हा मुख्यालयासह आठही तालुक्यात एकाचवेळी करण्यात आला. गोंदिया येथे सदस्यता नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ जयस्तंभ चौकातील ओबीसी संघर्ष कृती समितीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता झाला.
गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून ११ एप्रिल रोजी ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हा मुख्यालयासह ८ ही तालुक्यात करण्यात आला.जिल्हा मुख्यालयात जयस्तंभ चौकातील कार्यालयात या सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वèहाडे,मार्गदर्शक खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष कैलास भेलावे,महासचिव शिशिर कटरे,शहर अध्यक्ष विष्णु नागरीकर,ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे विनोद चौधरी,मनोज मानकर,तिर्थराज उके,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,शहर अध्यक्ष अशोक शहारे,नगरसेवक बंटी पंचबुध्दे,गणेश बरडे,नरेंद्र तुरकर,स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे,आनंदरावजी कृपाण,प्रा.एच.एच.पारधी,डॉ.घनश्याम तुरकर,डॉ.रुपसेन बघेले,जितेश टेंभरे,चंद्रभान तरोणे,राजेश कापसे,पी.डी.चौव्हान,प्रसध्दी प्रमुख सावन डोये,चंद्रकुमार बहेकार,महेंद्र बिसेन,रवी सपाटे,हरिष मोटघरे,प्रा.सविता बेदरकर,एस.यु.वंजारी,बंशीधर शहारे,रामकृष्ण गौतम,संजीव रहागंडाले,प्रमोद बघेले,संतोष वैद्य,राजू वंजारी,अनिल डोंगरवार यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व इतर गणामान्य उपस्थित होते.
सालेकसा- येथील तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने बसस्थानक परिसरात सदस्यता नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी कुवरलाल पटले,तालुकाध्यक्ष मनोज डोये,जिल्हासचिव मनोज शरणागत,विजय फुंडे,संजय बारसे,रमेश सोनवने,योगेश फुंडे,निर्दोष साखरे,उमेंद्र पटले प्रेमेश बिसेन,लालदास दशरिया,जि.सी.बघेले,विवेक बहेकार,वैभव हेमणे,मनोहर कटरे,कमलानंद रहागंडाले,अनिता चुटे,रqवद्र चुटे,शामभाऊ येटरे,प्रकाश टेंभरे,पवन पाथोडे,यशवंत शेंडे,लालचंद बोपचे,मौसलाल बिसेन,मधुकर हरिणखेडे,रमेश चुटे,निलेश बोहरे,जितेंद्र भास्कर,केवलचंद मेंढे,सुरेंद्र डोये,नानू टेंभरे,काशी पाथोडे,कृष्णा पटले,विमलताई कटरे आदी उपस्थित होते.
तिरोडा येथे तालुका ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष ओम पटले,वाय.टी.कटरे,होमेंद्र कटरे यांनी या अभियानाची सुरवात केली.गोरेगाव तालुक्यात या अभियानाची सुरवात जगत महाविद्यालयाचे उपप्राचार्य साहेबराव भैरम यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी जीडीसीसी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे,खरेदी विक्रीचे संचालक डेमेंद्र रहागंडाले,तालुका ओबीसी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप चव्हाण,शहर अध्यक्ष गुड्डू कटरे,कमलेश बारेवार,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.संजिव रहागंडाले आदी उपस्थित होते.
आजपासून सुरू झालेले हे ओबीसी सदस्यता नोंदणी अभियान गावागावात धडकणार आहे. वयाची १८ वर्ष झालेल्या आणि देशाच्या व राज्याच्या ओबीसी प्रवर्गात मोडत असलेल्या ओबीसी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची नोंदणी केली जाणार आहे.
ओबीसींना संवैधानिक हक्क तथा अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी या प्रवर्गाची जगगणना करणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येकवेळी न्यायालयीन प्रक्रियेत ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न उपस्थित करून त्यांचे संवैधानिक अधिकार नाकारण्याची खेळी खेळली जाते. तर दुसरीकडे केंद्र सरकार घटनेतील तरतुदींना हरताळ फासत ओबीसींच्या जणगणना करण्याचे जाणीवपूर्वक टाळत आहे. यामुळे या सदस्यता नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील ओबीसींची संख्या किती याचा आकडा या माध्यमातून गोळा करुन तो ओबीसींच्या न्यायहक्कासाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या या ओबीसी सदस्यता नोंदणी मोहिमेत प्रत्येक ओबीसी बांधवानी सक्रीय सहभाग नोंदवून एकही समाजबांधव यातून सुटणार नाही, या जिद्दीने कार्यकर्त्यांनी नोंदणी अभियान नेटाने पुढे न्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केले आहे.