खोटी तक्रार दाखल करणाºया जि.प.सदस्यावर कारवाई करा-उषा मेंढे

0
10

गोंदिया,दि.11-जिल्हा परिषदेच्या ३ एप्रिलच्या आमसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या सुनिता मडावी यांचेकडून जि.प. सभापती पी.जी.कटरे यांचेवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर त्यांचेकडून अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत पोलीसांत तक्रार करण्यात आली. तेव्हा कॉग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांच्या नेतृत्वात खोटी अ‍ॅट्रासिटीची तक्रार दाखल करणाºया सुनिता मडावी यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सभापती पी.जी.कटरे यांच्याविरूद्ध खोटी तक्रार दाखल करून अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दूरूपयोग करण्यात आला आहे. यात निष्पक्ष चौकशी झाल्यास सत्यता बाहेर येईल. खोटी तक्रार करून कायद्याचा दूरूपयोग करणाºयांवर कारवाइ करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येइल. अशी माहिती जि.प.अध्यक्षा उषा मेंढे यांनी आज मंगळवारला (ता.११) पत्रपरिषदेत दिली. दरम्यान खोटी तक्रार दाखल झाल्याचा आपण निषेध करत असल्याचे उपाध्यक्षा रचना गहाणे यांनी म्हटले. पत्रपरिषदेला जि.प.सदस्य रमेश अंबुले, लता दोनोडे, उषा शहारे, सीमा मडावी उपस्थित होते. दरम्यान विरोधकांनी राजकारण पुढे करून खोटी तक्रार केल्याचा आरोप पत्रपरिषदेत लावण्यात आला.