३५ पाणीपुरवठा योजनांचा विजपुरवठा खंडीत

0
10

गोंदिया,दि.11: जिल्ह्यातील ३५ पाणी पुरवठा योजनांनी महावितरणच्या विज बिलाचा भरणा न केल्याने परिणामी महावितरणने या योजनांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडीत केला करून ३५ पाणी पुरवठा योजनांना महावितरणने ङ्कशॉकङ्कच दिला तर ११३ योजनांना १२ एप्रिलपयंर्त अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मार्च महिन्यात महावितरणच्या गोंदिया परिमंडळाने जिल्हाभर वसुली मोहिम राबविली. जिल्ह्यातील ३४८ पाणी पुरवठा करणाèयां योजनांवर महावितरणचे लाखो रुपये थकीत होते. तेव्हा ३४८ पैकी २०० पाणी पुरवठा योजनांनी ६ लाख रुपये थकित वीज बिलाचा भरणा केला तर १४८ पाणी पुरवठा योजनांनी थकित बिल भरले नाही. महावितरणने थकित वीज बिल भरण्यासंदर्भात सदर योजनांना नोटीसही पाठविली होती. मात्र, ह्या पाणी पुरवठा योजनांच्या संबंधितांनी वीज बिलाचा भरणा केला नाही. परिणामी महावितरणने १४८ पैकी ३५ पाणी पुरवठा योजनांची वीज तात्पुरती खंडीत केली आहे.त्यामुळे या गावातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईला सामोेरे जावे लागणार आहे.
बील वसुलीसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला,परंतु लक्ष न दिल्यानेच थकीत वीज बिलाचा भरणा केल्यानंतर ह्या ३५ पाणी पुरवठा योजनांचा खंडीत केलेला वीज पुरवठा सुरू करण्यात येईल असे महावितरणचे मुख्य अभियंता जे.एम.पारधी यांनी म्हटले आहे.