ओबीसींसाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालय सुरू

0
17

गोंदिया,दि.13(berartimes.com)- ओबीसींच्या संवैधानिक मागण्यांच्या संदर्भातील आंदोलनाची दखल घेत राज्यात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यशासनाने या मंत्रालयाच्या प्रत्यक्ष कार्यभार सुरू होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आल्यासबंधीचे परिपत्रक गेल्या ७ एप्रिल रोजी काढले आहे.विशेष म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ८ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर विधानभवनावर लाखोंच्या संख्येत काढलेल्या मोच्र्यांनतर मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालयाची घोषणा केली होती,ओबीसी मंत्रालय हे ओबीसी आंदोलनाचे पहिले यश ठरले आहे.
राज्य सरकारने ओबीसी आंदोलनाची दखल घेत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग नव्याने सुरू केला आहे. गेल्या १ एप्रिल पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मधून या प्रवर्गातील जातींना विभक्त करण्यात आले आहे.
सदर विभागाकरीता पद निर्मिती आणि आकृतिबंध याबाबतची कार्यवाही पूर्ण होण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे या विभागाचा कार्यभार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून या विभागाची जबाबदारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागातील अधिकाèयांकडे सोपविण्यात आली आहे.
ओबीसी विभागाचे कार्य सांभाळण्यासाठी मंत्रालय व क्षेत्रीय आस्थापना या कार्यसनासाठी कक्ष अधिकारी म्हणून श्रीमती ज्यो.उ. टेंबुलकर व अ का. लक्कस आणि अवर सचिवपदी सी.अ. झाल्टे, वसंतराव नाईक वित्त आणि विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ या कार्यसनासाठी कक्ष अधिकारी म्हणून चं.ह. वडे, अवर सचिव म्हणून अ.कों.अहिरे आणि सहसचिवपदी ज्ञा.ल.सुळ, नोंदणी व रोख शाखा या कार्यसनासाठी कक्षअधिकारीपदी सु.स नाटेकर, अवरसचिवपदी सु.अ. पेडगावकर, शिष्यवृत्ती कार्यासनासाठी कक्षअधिकारीपदी चं.ह वडे,अवरसचिव पदी प्र.ज, ठाकूर आणि सहसचिवपदी दि.रा. qडगळे, विजाभज, इमाव व विमाप्र धोरण या कार्यसनासाठी कक्षअधिकारीपदी सु.दि. पाष्टे. अवरसचिवपदी सु.अ. पेडगावकर आणि सहसचिवपदी भा.र. गावित, विजाभज, इमाव व विमाप्र आश्रमशाळा कार्यासनासाठी कक्ष अधिकारी म्हणून सु.दि. पाष्टे. अवरसचिवपदी अ.कों. अहिरे आणि सहसचिवपदी दि.रा. qडगळे तर अर्थसंकल्प या कार्यासनासाठी कक्षअधिकारी म्हणून श्रीमती गी.नि.चव्हाण, अवरसचिवपदी .व. बगाडे तर सहसचिव म्हणून भा. र. गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.