ग्राहकसेवेत हयगय करणाऱ्यांवर कारवाई होणार- संजिवकुमार

0
13

मुंबई,दि.18- महावितरणचे दैनंदिन कामकाज अधिक गतीशील, पारदर्शी  आणि परिणामकारक बनविण्यासाठीमहावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी  राज्यभरातील तंत्रज्ञांशी व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. तंत्रज्ञ इतर कर्मचाऱ्यांकडून प्राप्त सूचनांच्या आधारावर  संजीव कुमारयांनी ग्राहकसेवेत सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण निर्देश दिले असून सेवेत हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचाइशाराही त्यांनी यावेळी दिला. तंत्रज्ञांशी थेट संवाद साधणारे  संजीव कुमार हे महावितरणचे पहिलेच अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आहेत.महावितरणमधील सर्व 16 परिमंडलांतील मुख्य अभियंत्यांसोबत अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री.संजीव कुमार यांनी दि. 17 एप्रिल 2017 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी केवळ मुख्यअभियंत्यांसोबत संवाद साधता संजीव कुमार यांनी तंत्रज्ञ, जनमित्र, ऑपरेटर, कर्मचारी यांचेही म्हणणेऐकून घेतले. त्यांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संजीवकुमार यांनी यावेळी दिले. नांदेड परिमंडलातील तंत्रज्ञ विशाल वागरे, प्रधान यंत्रचालक रमेश ताडेवाड,अमरावती परिमंडलांतर्गत यवतमाळ मंडल कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. नरेंद्र विठ्ठलराव धवडयांनी मोबाईल ऍ़प्सच्या माध्यमातून ग्राहकसेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्री. संजीव कुमार यांनी त्यांचेकौतुक केले. इतर सर्व कर्मचार्यानीसुध्दा कार्यतत्परता दाखवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.फोटो मीटर रिडिंग, मीटरचे छायाचित्र, फिडर डीटीसी मीटर रिडिंग, नवीन वीज जोडणी, वीजबील भरणा इतर दैनंदिन कामे ही मोबाईल ऍ़प्सद्वारेच करण्यात यावीत.  ही कामे करणाऱ्या संस्थेने यामध्ये हयगय केल्यास यासंस्थेच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश श्री. संजीव कुमार यांनी दिले. तसेच ग्रामीण भाागातील ग्राहकांना दिलाजाणारा एसएमएस हा मराठीतून देण्यात यावा, असेही निर्देश श्री. संजीव कुमार यांनी दिले.