नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित

0
10

नरेश तुप्तेवार

नांदेड,दि.22 :- पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेसाठी विविध उपक्रम राबवित जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी तीन महत्त्वपुर्ण पॅटर्न मांडले, वंचितांसाठी अन्न सुरक्षा व उज्ज्व नांदेड अशा अभिनव संकल्पनांना मुर्त रूप देण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न करणारे नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाला असून हा पुरस्कार घोषीत करण्यात आला. २१ एप्रिल २०१७ रोजी नागरी सेवा दिनानिमित्त मुबाईतील सहयाद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांना उत्कृष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ,उद्योगमंत्री देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.

नांदेड येथे २० एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नांदेडचे पालकमंत्री ना. अर्जून खोतकर यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले होते

जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी नांदेड जिल्ह्यात रूजू झाल्यापासूनच लोकाभिमुख तसेच अनेक नाविन्यपुर्ण संकल्पना राबविण्यात सातत्य ठेवलेे. या सर्व कामांचा या पुरस्कारासाठी निवड करताना विचार करण्यात आला आहे. विशेषतः मे २०१५ मधील दुष्काळाच्या झळा तसेच टंचाईचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी विविधस्तरावर प्रयत्न केले. विविध यंत्रणांचा समन्वयही साधला. यामुळे पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करता आली. त्यासाठी इसापूर धरणातून थेट बाभळी बंधाऱ्यापर्यंत कमीतकमी खर्चात, आणि पाण्याचा कमीत कमी अपव्यय होऊन पिण्याचे पाणी उपलब्ध केले. नांदेड शहरासाठीही येलदरी धरणातून विष्णुपुरीपर्यंत पाणी आणले होते.

जिल्ह्यासाठीच्या विकास आराखड्यातील निधींचे काटेकोर नियोजन, तसेच पुरेपूर विनीयोग करत प्रशासनातील मानवी आस्थाही विविध उपक्रमानी वृद्धींगत केली आहे. यामध्ये वंचितासाठी अन्न सुरक्षा या उपक्रमास थेट राष्ट्रपती भवनातील सादरीकरणासाठी निमंत्रित कऱण्यात आले आणि त्याच्याविषयी कौतुकोद्गारही काढण्यात आले. प्रशासकीय रेट्यातही त्यांनी प्रचंड थंडीच्या दिवसात निराधारांना शालींचे वाटप, निराधार मुलींसाठी दंगल चित्रपट दाखविण्याचा उपक्रम राबविला.यासह विविध बाबींचा सर्वंकष विचार करून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांचे हस्ते त्यांना सन्मान करण्यात आले.