कपडे धुण्यास गेलेल्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू;युवकाच्या समय सुचकतेने दोघींचे प्राण बचावले

0
13
अर्धापूर तालुक्यातील पार्डी(म)येथील घटना
नांदेड,दि.01(berartimes.com)-अर्धापूर तालुक्यातील पार्डी(मक्ता)येथील नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातील पाण्यात कपडे धुण्यास गेलेल्या एका महिलेसह तिन मुली पाण्यात बुडल्या त्यातील दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बाबा उर्फ एजाज नदाफ शालेय युवकाचे  धाडस व त्याच्या समयसुचक प्रयत्नामुळे दोघींचे प्राण बचावले ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली असून या घटनेने गावासह तालुक्यात शोक कळा पसरली आहे.अनेकांनी घटनास्थळी भेट देउन हळहळ व्यक्त केली.
 या बाबत वृत्त असे की,पार्डी (मक्ता) गावाच्या उत्तरेकडे असलेल्या नदीवर बंधारा बांधण्यात आला असुन बंधाऱ्यामध्ये धरणाचे पाणी सोडले असल्याने बंधाऱ्यात मोठा जल साठा आहे महादेव मंदिरजवळील  बंधाऱ्याच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी  गावातील शेख आफरीन शेख गुलाब व त्यांच्या सोबत मामाकडे शिक्षणासाठी राहात असलेली शेलगाव ता अर्धापूर येथील सुमय्या शेख शफी वय (१५ ),अफसर शेख मंहमदसाब (२२)रा.पार्डी,शेख तबसुम शेख नुर (१५) या चौघी रविवारी दुपारी गेल्या असताना एकीचा पाय घसरून पाण्यात पडली
वाचविण्याच्या प्रयत्नात सोबतच्या तिघीजणी पाण्यात पडून पोहता येत नसल्याने त्या बुडत होत्या मताची बहिणी शन्नो शेखच्या लक्ष्यात आल्याने तिने आरडाओरडा केली  त्यात बंधाऱ्या जवळच सायकल खेळत असलेल्या बाबा उर्फ एजाज नदाफ वय १४ याने पाण्यात बुडत असलेल्या मुलीना पाहिले व प्रसंगावधान साधून धाडसाने बुडत असलेल्या मुलींना मदत करत दोघीस बाहेर काढले याची वेळेस गावातील काही मंडळी राजेश्वर देशमुख,ईर्षाद महेमुद,पुंजाराम मदने यांनी बंधाऱ्यातील मुलीला बाहेर काढून प्राथमिक उपचार करून पोटातील पाणी काढले.व त्याना एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता अफसर शेख महमद साब२२व सुमय्या शेख चाॅद शफी वय १५ राहणार शेलगाव यानां मृत घोषित केले.या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघींचे प्राण एका शालेय युकाच्या प्रयत्न धाडस व  गावातील नागरीकामुळे बचावले.मृत्यू मुली ह्या गरीब शेतमजुरांना करणाऱ्या कुटुंबातील असुन या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातआहे.
दरम्यान महसुली विभागाचेअधिकारी व पोलीस निरीक्षक विजय डोंगरे,व कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी भेट देउन  माहीत घेउन पंचनामा केला.
मृत मुलीवर सायंकाळी शोकाकुल वातावरणत दफनविधी करण्यात आला.या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदकरण्यातआलीअसूनपुढील तपास जमादार महेंद्र नागकुमार,राजू पाटोळे हे करीत आहेत.