विदर्भाच्या विकासात 1 मे काळा दिवस-राकेश भास्कर

0
14
SONY DSC

साकोली,दि.01-१ मे १९६० ला विदर्भ महाराष्ट्रात सहभागी झाला, नव्हे तो नागपूर करारामुळे सहभागी करून घेण्यात आला. १९६० नंतर नागपूर कराराचा सातत्याने केलेला भंग, विदर्भ विरोधी धोरण आणि योजनामुळे विदर्भाचे प्रचंड नुकसान झाले.महाराष्ट्राचा विकास म्हणजे मुंबई, पुणे आणि नाशिक या त्रिकोणात झालेल्या औधोगिक आणि शैक्षणीक हब मुळे चुम्बकाप्रमाने विदर्भातील मानव संशाधन खेचल्या जात आहे. बेरोजगारी वाढली, सिंचनाच्या  पुरेश्या सोयी नसल्यामुळे शेती तोट्याची ठरू लागली आहे, हाती आलेले धानपीक केवळ एका पाण्यासाठी निसटून जाते, कर्ज वाढते आणि त्याच विवंचनेत विदर्भात आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.जगाचा पोशिंदा आज भूकबळी, कर्जापाई आत्महत्या करतो त्याचे पाप १ मे ह्या तारखेला असल्याने विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे विचार येथील प्रगती काॅलनीत आयोजित विराच्या कार्य्क्रमात विदर्भ राज्य आघाडी चे  विदर्भ प्रदेश सचिव राकेश भास्कर यांनी व्यक्त केले.

विदर्भाचा ध्वज राकेश भास्कर यांच्या हस्ते फडकावून व त्यांच्या रक्ताची स्वाक्षरी घेवून कार्यक्रमाला सुरुवात झाली.श्रीहरी अन्येंच्या नेतृत्वाला जनमानसांमध्ये मान्यता असल्यामुळे त्यामार्फतच विदर्भाचे राज्य स्थापन होण्याची आशा निर्माण झालेली आहे म्हणून त्यांचे हाथ बळकट करुण संघटन वाढीस मदत करून विदर्भ राज्य मिळविणे ही आमची व काळाची गरज आहे. असे म्हणत त्यांनी  विदर्भाच्या मागणीला समर्थनाची मागणी केली.विदर्भाची मागणी ही सामान्य  जनतेची आहे हे मा.प्रधानमंत्री यांना सांगता यावे, म्हणून वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे, रक्ताने अंगठा मारून सही केलेले (रक्ताक्षरी) निवेदन संपूर्ण विदर्भातून मा. प्रधानमंत्री यांना पाठविण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आघाडी (वीरा) तर्फे करण्यात येत आहे. ह्या रक्ताक्षरी अभियानात वीरा चे प्रदेश सचिव राकेश भास्कर, साकोली नगर परिषद चे नगरसेवक मनीष कापगते, समाज कल्याण विभागाचा समाज भूषण पुरस्कार प्राप्त डी.जी.रंगारी, समाज प्रवर्तक शब्बीरभाई पठाण, साकोली वीरा चे दीपक जांभूळकर, सुनील जांभूळकर, श्रीराम इंटरनाशणल ग्रुप चे अध्यक्ष अखिलेश गुप्ता, कांग्रेस नेते दिलीप मासुरकर,शरद उरकुडे, चेतन खोब्रागडे, हिवराज टेंभूरणे, विजय रंगारी, महेश शहारे, लक्ष्मन टेंभूरने, अशोक बेहरे, लक्ष्मन राऊत, सुनील वाढई, घनश्याम दोनोडे, युवराज वाढई, हिरालाल किरनापुरे, दिनेश कापगते, सिराज भाई, शिवनाथ राऊत, वसंत शिवणकर, हेमकृष्ण कापगते, देविदास चुटे, इमरान पठान, सोनू भुरे, राज गणवीर, अभिलास गजभिये, जी.एस.आवरकर, एस.आर.आगाशे, अजय जवंजाळ, आकाश सोफंडे तोसीफ शेख, प्रमोद टेंभूरणे, सतीश देशमुख, लखन चांदेवार, साहिल गायधने, निखील गिर्हेपुंजे, रामाधीश कांबळे, विलास शेंडे, व्ही.पी.शिवरकर अमीन शेख व इतर असे एकूण १२८ विदर्भ वाद्यांनी स्वताच्या रक्ताने अंगुठा लावून वेगळ्या विदर्भाची मागणी केली.कार्यक्रमाचे संचालन दीपक जांभूळकर यांनी केले.