वीरा च्या रक्ताक्षरी अभियानात महिलांचा उत्फुर्त सहभाग

0
12
भंडारा, दि.१-  आमचं हे रक्ताचं बलिदान म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची नांदी आहे. आता आम्हाला विदर्भ घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असा इशारा वीरा चे भंडारा जिल्हा अध्यक्ष ऍड पद्माकर टेम्भूर्णीकर यांनी दिला. ते १ मे च्या भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात वीरा तर्फे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून झाली. त्यानंतर विदर्भाचा झेंडा फडकवून राष्ट्रगीताचे गायन झाले.
पुढे ते म्हणाले आतापर्यंत कर्ज व नापिकीपायी विदर्भात ३५००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या रोखण्यासाठी स्वतंत्र विदर्भ होणे गरजेचे आहे. विदर्भाची ओळख फार पुरातन काळापासून आहे. आम्ही स्वतंत्र होतो परंतु राजकीय स्वार्थापोटी विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करण्यात आले. राज्य पुनर्निर्माण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती धर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची शिफारस केली होती परंतु त्याचवेळी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीची चळवळ सुरु होती आणि विदर्भ वेगळा झाल्यास मुंबई गुजरात मध्ये सामील होईल व उर्वरित महाराष्ट्र पुष्कळ छोटा राहील आणि त्यामुळे विदर्भाची चळवळ थांबवा अशी तंबी त्यावेळी राजकारण्यांनी दिली. व संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ सामील करा. त्यामुळे आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या दावणीला बांधल्या गेलो आणि त्यावेळपासून आमची अधोगती सुरु झाली परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, विजेचे लोडशेडिंग. बेरोजगारी, गरिबी आमच्या वाट्याला आली आणि पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. आता बस झाले “रक्ताक्षरी” ने आमची बलिदानाच्या दिशेने तयारी सुरु झाली. येत्या केंद्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित करावा असे आवाहन त्यांनी केले.
    डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा छोट्या राज्यांचे पुरस्कर्ते होते, छोट्या राज्यांची निर्मिती म्हणजे प्रगतीकडे वाटचाल होय. विदर्भ निर्मितीच्या लढ्यात महिलांनी आणि तरुणींनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते यांनी केले. यावेळी विदर्भवाद्यांनी समयोचित भाषणे झाली. मोठ्याप्रमाणात लोकांनी रक्ताक्षऱ्या करून विदर्भ  लढ्याला समर्थन दिले. यात महिला व तरुणी सहभागी झाल्या हे विशेष. सहनशीलतेचा अंत पाहू नये आजपासून “रक्ताक्षरीने ” “अंताचा लढा’ विदर्भवाद्यांनी यावेळी गर्भित इशारा दिला. यावेळी मंचावर  पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते, जिल्हा सचिव, रमाकांत पशीने, केशव हूड,  प्रवीण भेलावे, शैलेंद्र निंबार्ते, अजय मेश्राम, प्रा.वडेटावार, मनीषा टेम्भूरने, सोनाली भेलावे, बबिता तिडके, संगीता बनसोड, वर्षा माटूरकर, प्रगती ढवळे, अमित टीचकुले, वृंदा गायधने, निहार बुलबुले, , बिट्टू सोनकुसरे, चारुदत्त बाळबांडे, प्रवीण कळंबे, अंकित बांते, कु. पी झेड गोसावी, ऍड काटेखाये,पंडित भालाधरे, ललितसिंह बाच्छिल, संजय बनसोड, भास्कर बांगडकर, व इतर विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन केशव हूड यांनी तर आभार प्रदर्शन रमाकांत पशिने यांनी केले.