राजकीय निर्णयात सामाजिक संघटनेचे हस्तक्षेप – कलमूर्गे

0
15

बिलोली तालुक्यातील कासराळी ग्रा.पं. प्रकरण

बिलोली,दि.13: बिलोली तालुक्यातील कासराळी ग्राम पंचायतचे सरपंच सौ. हायगले यांच्यावर त्याच ग्रामपंचायत मधील सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केले आहेत, त्यांचं काम योग्य रीतीने नसल्याचे सांगून अविश्वास दाखल केले.
हा राजकीय आणि निवडून आलेल्या सदस्यांचा निर्णय असून, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांनी संघटनेचा वापर करीत एका समाजाच्या नेत्यांवर आरोप करीत चिखलफेक करू नये, असा मोलाचा मार्मिक सल्ला मन्नेरवारलू समाजाचे लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी दिला आहे. हा प्रश्न राजकीय असल्यामुळे तो राजकीय पातळीवर सोडवल्या जाईल, पण एखाद्या नेत्यांवर आरोप करीत आपल्यासहित एखाद्या चांगल्या संघटनेचे प्रतिमा मलीन करू नये असेही कलमूर्गे यांनी म्हटले आहेत.
बिलोली पंचायत समीती उपसभापती निवड लक्ष्मण ठक्करवाड यांच्या प्रयत्नाने
लिंगायत समाजाचे दत्तराम बोधने यांची उपसभापती म्हणून निवड झाली तेव्हा बसव ब्रिगेड च्या समर्थकानी ठक्करवाड यांचा आभार का मानला नाही, त्या वेळेस बसव ब्रिगेड कुठे होता ? अशा राजकीय निर्णयात अभ्यास न करता कुठलातरी विषय घेऊन स्वच्छ व चांगले कार्य असलेल्या संघटनेचे नाव बदनाम करू नये, व या विषयाचा अभ्यासही संघटनेच्या वरिष्ठांनी करावा असे लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी म्हटले आहेत. संघटनेच्या नावांमध्ये एका महामानवाचे नाव आहे, त्या महामानवाचा आम्हीही आदर करतोत, त्यांच्या नावाला व संघटनेला गालबोट लागेल असे आपण वागू नये, याचा दुःख आम्हालाही होते असे कलमूर्गे यांनी सांगितले. या प्रकरणात कुठल्याही समाजाचा किंवा व्यक्तीचा द्वेष नसून त्या ग्रामपंचायत सदस्यांचा तो त्यांना योग्य वाटेल असा निर्णय आहे, त्यात तेवढे हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही कलमूर्गे यांनी सांगितले.