एचपी गॅसचे हंडे घेऊन येणार्या ट्रकच्या चाकाला आग

0
11

तिरोडा,दि.16 मे- तालुक्यातील तिरोडा-तुमसर मार्गावरील बिर्सी फाट्याजवळ नागपूरवरुन गोंदियाकडे एचपी गॅसचे सिलेंडर घेऊन येत असलेल्या ट्रकच्या मागच्या टायरला लागलेल्या अचानक आगीमुळे एकच खळबळ माजली.परंतु ट्रकचालकाच्या लक्षात ही बाब येताच ट्रकला थाबवून नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालविले.सोबतच अदानी प्रकल्पातील अग्निशमनदलाल बोलावण्यात आले.त्यामुळे आगीने होणारी मोठी घटना ट्रकचालकाच्या सतर्कतेने मात्र टळली.