दाऊदच्या नातेवाईकाचं लग्न, दावतला गिरीष महाजनांची हजेरी

0
7

गेल्या आठवड्यात नाशिकमधल्या जग्गी कोकणी यांच्या धाकट्या मुलीचा विवाह शहरातले प्रसिद्ध धर्मगुरु खतीब यांच्या मुलाशी झाला. जग्गी कोकणी यांची मोठी मुलगी ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची सून आहे. त्यामुळे दाऊदच्या नातेवाईकांचा विवाहसोहळा अशी या लग्नासंदर्भात चर्चा होती.गेल्या आठवड्यात नाशिकमधले जग्गी कोकणी आणि खतीब कुटुंबीयांतल्या मूळ मुलीचा विवाह सोहळा पार पडला. कोकणी यांची मोठी मुलगी कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या मुलाला दिली आहे. आता लहान मुलीचा विवाह शहर खतीब यांच्या पुतण्याला दिली. या विवाह सोहळ्याला नाशिकमधल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.या लग्नात हजेरी लावून दावत खाणाऱ्या एका एसीपी, 2 पीआय, 2 पीएसआय आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी झाडाझडती घेतली.

खतीब कुटुंबीय हे नाशिक शहरातील प्रमुख मुस्लिम धर्मगुरू असून धार्मिक कार्यक्रमांमुळे त्यांचे पोलीसांशी सलोख्याचे संबंध आहे. ईद, इफ्तारच्या पार्टी, शांतता समितीसाठीही पोलीस आयुक्तांसाह सर्व अधिकारी राजकारणी  त्यांच्या घरी कायम जातात. त्यांच्या निमंत्रणावरूनच आपण लग्नाला गेलो असं स्पष्टीकरण या पोलिसांनी चौकशी दरम्यान दिलं. कोकणी कुटुंबीय नाशिकमधलं बडं राजकीय- सामाजिक प्रस्थ आहे.दुसरीकडे सर्व राजकारणी, नेते, अधिकारी यांनी दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावली. या लग्नात देशभरातले बुकी आणि काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही हजर होते अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे दाऊदच्या नातेवाईकांच्या या गोतावळ्याची कल्पना आयबी, रॉ सारख्या संस्थांनाही नव्हती का असा सवाल उपस्थित केला जात आहे.