इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट

0
5

मुंबई, दि. 22 :  इस्त्राईलने मोशाव पद्धतीची शेती करीत शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये विविध प्रयोग केले आहेत. या सर्व शेती प्रयोगांना जीटूजी (गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट) धर्तीवर राबविण्याचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी इस्त्राईलचे कॉन्सुल जनरल डेव्हिड अकॉव यांच्यासह राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार, गृह विभागाचे (अपील व सुरक्षा) प्रधान सचिव श्रीकांत सिं‍ह आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. या भेटीत शिष्टमंडळाने कृषी, गृह आणि नगरविकास विभागाच्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा केली.