कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा नाही : उद्धव ठाकरे

0
6

शेतकरी लढ्याचा इतिहास घडवणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी आज मी इथं आलोय. मराठवाड्यातील शेतकरी कदाचित या कर्जमाफीने उत्सव साजरा करतील, पण ज्या शेतकऱ्यांनी संपाची ठिणगी टाकली ते शेतकरी वंचित कर्जमाफीच्या फायद्यापासून वंचित राहिल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.तसंच दिनांक  1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सरकारनं 2016 ऐवजी 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा द्यावा, कांद्याला हमीभाव द्यावा यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.