रविवारी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कर्जमाफीविषयक प्रश्नांना सडेतोड उत्तरे

0
10

मुंबई, दि. 7 : कर्जमाफी सरसकट का नाही, कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, ३४ हजार कोटींचा मेळ कसा घातला, कर्जमाफीने शेतकरी सुखी होईल काय,प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय का …. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अशा विविध प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. येत्या रविवारी ९ जुलै २०१७ रोजी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्यांना पडलेल्या या प्रश्नांना उत्तरे मिळणार आहेत.
राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ र्यक्रमाच्या ‘शेतकरी कर्जमाफी’ या विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी म्हणजे ९ जुलै २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन सकाळी १० वाजता प्रसारण होणार आहे. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी, झी २४ तास आणि साम टिव्ही या वाहिन्यांवरुन सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होईल. याच दिवशी सकाळी १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर त्याचे प्रसारण होईल. कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दिनांक १० जुलै २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी ५.३० वाजता होईल.आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार दि. १० जुलै, मंगळवार दि. ११ जुलै व बुधवार दि. १२ जुलै रोजी सकाळी ७.२५ वाजता होईल.