आयआयटी, एनआयटी प्रवेशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

0
11

नवी दिल्ली, दि. 7 – आयआयटी, आयआयआयटी, एनआयटी आणि इतर महाविद्यालयातील इंजिनीअरिंगच्या प्रवेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आधी बोनस मार्कांचा मुद्दा सोडवा आणि मगच या प्रवेशाला परवानगी द्या, असे न्यायालयाने सांगितले आहे.

न्या. दीपक मिश्रा, ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. या सुनावणीत पुढील आदेश येईपर्यंत काउन्सलिंग आणि प्रवेश न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवेश परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांसाठीही आयआयटीने सर्व विद्यार्थ्यांना बोनस मार्क दिल्यानं गोंधळ उडाला आहे. ज्यांनी चुकीचा प्रश्न सोडवलाच नाही, त्यांनाही बोनस मार्क देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 33 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य आधीच दावणीला लागलेले आहे. बोनस मार्क वैध असल्याचा निर्णय झाल्यावरच या संस्थांमध्ये प्रवेशाला परवानगी देता येईल. बोनस मार्क ही एक समस्या आहे आणि ती समस्या लवकरात लवकर सोडवायला हवी, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.