चकमकीत एक महिला नक्षली ठार-रानवाही जंगलातील घटना

0
16

गडचिरोली,दि..१०: मालेवाडा उपपोलिस ठाण्यांतर्गत रानवाहीनजीकच्या जंगलात आज दुपारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. आज नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान रानवाही परिसरात नक्षलशोध मोहीम राबवीत असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, एका नक्षली महिलेचा मृतदेह आढळून आला. तिच्याकडे एक १२ बोर रायफल आढळून आली. शिवाय पोलिसांनी पिट्टू व अन्य साहित्यही ताब्यात घेतले आहे. परिसरात नक्षलशोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.