कर्जमाफीच्या जाहिरातबाजीवर ३६ लाखांची उधळण!

0
12

मुंबई,दि.21-राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठाम उभं असल्याचं सांगत ३४ हजार कोटींची ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणाऱ्या फडणवीस सरकारने निर्णयाच्या जाहिरातबाजीवर तब्बल ३६ लाख ३१ हजारांची उधळण केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्य सरकारने दोन दिवसात ५१ वृत्तपत्रांमध्ये यासंबंधी जाहिरात दिली होती. या जाहिरातींवर सरकारने ३६ लाख ३१ हजार रुपये खर्च केले आहेत. यात टेलिव्हिजन वाहिन्या आणि होर्डिंग्जवरील जाहिरातीचा खर्चाचा समावेश नाही. त्यामुळे खरा आकडा यापेक्षाही मोठा आहे.