उदयनराजेंच्या अटकेनंतर साताऱ्यात उत्स्फूर्त बंद

0
32

सातारा,दि.25: साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात झाल्यानंतर सातारा शहरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला आहे.उदयनराजेंना कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार उदयनराजे यांना पोलिसांनी थेट न्यायालयीन कोठडी द्या, अशी मागणी केली आहे. उदयनराजे यांचा सदर गुन्ह्यात व्हाइस रेकॉर्डिंग पोलिसानी घेतले असल्याने पोलिस कोठडीची आवशक्यता नसल्याचे सांगितले आहे.
उदयनराजे पोलीस ठाण्यात हजर होण्याआधी साताराकरांनी संयम पळाला होता. मात्र, त्यांना अटक झाल्यानंतर येथील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला.या बंदमध्ये अनेक व्यापारीही सहभागी झाले असून सध्या साताऱ्यातील बरेच व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच अनेक शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच फेटाळला होता. आज त्यांनी आज सातारा शहर पोलिस स्टेशनला हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजेंना अटक करण्यात आली.
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले होते.दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस खासदार राजीव सातव, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे.

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप
उदयनराजे यांना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचाही आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरुन केला होता.36 हजार एकर जमिनीचे मालक असलेले उदयनराजे दोन लाख रुपयांची खंडणी मागतील का? असे आमदार जितेंद्र आव्हाडा यांनी ट्विट केले आहे.