न्याय व्यवहारात मराठीचा सक्षम वापर; अभ्यासगटाची स्थापना

0
10

मुंबई, दि.23 : न्याय व्यवहारात मराठीचा सक्षमपणे वापर करण्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करण्याकरिता अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे.
या अभ्यासगटामध्ये विधी व न्याय विभागाच्या विधी-नि-प्रारुपकार आणि सह सचिव मंगला ठोंबरे, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव आणि प्रभारी भाषा संचालक हर्षवर्धन जाधव आणि ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ॲड शांताराम दातार यांचा समावेश आहे.
केंद्र आणि राज्य अधिनियमाच्या मराठी अनुवादाच्या विद्यमान कार्यपध्दतीचा अभ्यास करुन त्यातील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने उपाय योजनांची आखणी करण्याकरिता शासनास शिफारस करणे, भाषा विकास योजना, केंद्र आणि राज्य अधिनियम अनुवाद कार्यपध्दती यासंबंधी केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना भेटी देऊन तेथील कार्यपध्दतीचा तुलनात्मक अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करणे, अन्य राज्यांमध्ये सुरु असलेल्या आदर्श कार्यपध्दतीचा (Best Practices) अभ्यास करुन, या अभ्यासगटाने त्याबाबत अंमलबजावणीबाबत माहिती घ्यावी तसेच राजभाषेचा विकास, त्याबाबतच्या योजना आणि न्यायालयीन व्यवहारात राजभाषेचा वापर याकरिता अन्य राज्यात असलेल्या विभागीय रचनेचा तुलनात्मक अभ्यास करणे, अशी या अभ्यासगटाची कार्यकक्षा असणार आहे.