राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे महाधिवेशन मुबंईत २०१८ ला

0
15
नागपूर,दि.28 : देशभरातील ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत एकजूट होत असल्याची जाणीव केंद्र सरकारला दिल्ली येथे पार पडलेल्या ७ ऑगस्टच्या दुसèया राष्ट्रीय महाधिवेशनामुळे झाल्याने नॉन क्रिमीलेअरची मर्यादा ६ लाखावरून ८ लाखापर्यंत वाढविविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र राज्यघटनेत अशी कुठलीच तरतुद ओबीसींसाठी नसल्याने ही असैवधानिक अटच रद्द करण्याच्या मागणीवर ओबीसी महासंघ ठाम असल्याची भूमिका रविवार(दि.२७) ला पार पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आली.सोबतच तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन हे मुंबई येथे आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली.
येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,निमंत्रक सचिन राजूरकर मंचावर उपस्थित होते. या आढावा बैठकीत नॉन क्रिमिलेयरच्या मर्यादेत वाढ केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले.सोबतच ओबीसीमध्येच ओबीसींचे वेगळ्या आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगावर आक्षेप नोंदवित सर्वात आधी ओबीसींची जातनिहाय जनगणना जाहिर करण्यात यावे त्यानंतरच सरकारने इतर बाबींचा विचार करावा असा सुर आढावा बैठकीत वक्त्यांनी व्यक्त केले.या बैठकीत येत्या २६ नोव्हेंबरला विद्यार्थी,युवक व युवतीचे महाधिवेशन घेण्याचे ठरविण्यात आले.तसेच तिसरे महाधिवेशन हे महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई येथे घेण्याची घोषणा सयोंजक तायवाडे यांनी जाहिर केली.बैठकीत महासंघाच्या आर्थिक बाबीवर सुध्दा चर्चा करण्यात आली.यावेळी माजी खासदार डाॅ.बाेपचे यांच्यासह अनेकांनी विचार व्यक्त केले. या बैठकीला ,महिला अध्यक्ष सुषमा भड,प्रा.शेषराव येलेकर, युवा अध्यक्ष मनोज चव्हाण,शरद वानखेडे,गुणेश्वर आरीकर,निलेश कोढे,आशिष जवळे,अनिता ठेंगरी,कृष्णा देवासे,संजय पन्नासे,नाना लोखंडे,श्रीमती मानकर,भैय्या रडके,गोविंद वरवाडे,प्रा.एन.जी.राऊत,शकील अहमद,श्री तिघारे,विजय पटले आदी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रास्तविक निमंत्रक सचिन राजुरकर यांनी केले.आभार संजय पन्नासे यांनी मानले.