दसऱ्यापूर्वी कर्जमाफी करा, राज्यभर शिवसेनेचे मोर्चे

0
43

IMG-20170911-WA0005भंडारा : शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दसऱ्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांचे कर्जमुक्त करा या विषयावर शिवसेना जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात मुखमंत्री यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. रचनात्मक सुधार करून शेतकऱ्यांना त्रास न देता शक्य तितक्या लवकर दसऱ्यापूर्वीच सर्व शेतकऱ्यांचे कर्जमुक्त करण्यात यावे. जर दसऱ्यापूर्वी सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने भव्य तेज विराट आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख यशवंत वंजारी, संदीप वाकडे, पंचायत समिती उपसभापती ललित बोन्द्रे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख अनिल गायधने, अरविंद बनकर, किशोर चन्ने, भरत वंजारी, राजू ब्राम्हणकर, पवन चव्हाण, विधानसभा प्रमुख महेश पटले, शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष मनोहर जागळे, शिवसेना विधी न्यायचे जिल्हा अध्यक्ष ऍड. रवी वाढई, अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष मोईन रहमान शेख, सतीश तुरकर, तोपलाल रहांगडाले, पुरुषोत्तम टेभरे, युवासेना जिल्हा अध्यक्ष मुकेश थोटे, मयूर लांजेवार, संदीप सार्वे, रतन झिंगरे, प्रमोद मेश्राम, राजू परशुरामकर, अण्णा सोनकुसरे, सुरेश गजापुरे, कृपाशंकर डहरवाल, योगेश सोनकुसरे, सुरेश दुर्गे, रामचंद्र रामटेके, राहुल मेश्राम, अजय मते, गणेश खेडीकर, राहुल बांते, प्रतीक दिघोरे, सुभाष मते, कैलास मोटघरे, शरद दिघोरे, किशोर वाघाये, दीपक सोनवणे, शशिकांत भोयर, रंजित निबारते, सुधीर लोहबरे, नंदू पडोळे सह अनेक शिवसैनिक व शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाशिममध्ये शिवसेनेत फाटाफूट

शिवसेनेने राज्यभरात कर्जमुक्ती मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येत आहेत. मात्र मागणी एक आणि मोर्चे दोन हे चित्र वाशिममध्ये पाहायला मिळालं. वाशिममध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.मात्र, त्याच मोर्चाच्या अगदी काही अंतरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा दुसरा मोर्चा निघाल्याने सेनेतील गटबाजी आता किती चव्हाट्यावर आली आहे हे यावरून दिसून येते.

 चंद्रपुरात धरणे आंदोलन

सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही नवरात्रीच्यापूर्वी देण्यात यावी, या मागणीसाठी आज चंद्रपुरात शिवसेनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले.सरकारने कर्जमाफीची केवळ घोषणा केली, मात्र अजून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असूनही अजून हजारो शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे फॉर्म भरुन झालेले नाहीत. त्यामुळे ही कर्जमाफी अजून किती काळ लांबणार, असा सवाल करत दसऱ्यापूर्वी कर्जमाफी द्यावीर अशी मागणी शिवसेनेने सरकारकडे केली आहे.

सोलापूर- शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कर्जमाफीची अमंलबजावणी तातडीने करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. दसऱ्यापूर्वी कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक आग्रही आहेत. कर्जमाफीच्या नावावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा  आरोप शिवसैनिकांनी केला.

औरंगाबाद –“कर्जमाफीच्या घोषणेला तीन महिने झाले, तरीही अटी आणि शर्थीतच कर्जमाफी अडकली आहे. दसऱ्यापूर्वी कर्जमाफीची पूर्तता करा. अशी मागणी शिवसेनेने केली.  शिवसेनेच्यावतीने औरंगाबादच्या विभागीय आयुक्त् कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते,नेते आणि शेतकरी सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेताना अडचणी आल्या, तरीही या अडचणीत शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने फॉर्म भरले. आता सरकारकडून तारखांवर तारखा दिल्या जात असल्याने,  कर्जमाफी कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. म्हणून दसऱ्यापूर्वी ही कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.