मासेमारी लिलावामध्ये पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करु-मुख्यमंत्री

0
9

मुंबई, दि. 14 : पेसा कायद्यानुसार आदिवासी क्षेत्रात मासेमारी लिलाव देताना पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना प्राधान्य द्यावे; अशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिली.
बैठकीमध्ये मत्स्य व्यवसाय विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार नाना पटोले, आमदार विजय रहागंडाले,आमदार परिणय फुके, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पदुम सचिव विकास देशमुख, महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण शिंदे, मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित
होते.