अभियंत्यांच्या योग्य नियोजनामुळेच मिरा भाईंदरकरांना पाणी मिळाले – रोहिदास पाटील

0
8

भाईंदर. ( प्रतिनिधी ),दि.16 – अभियंत्यांच्या योग्य नियोजनामुळेच शहरातील नागरिकांना पाणी वेळेवर मिळत आहे असे प्रतिपादन सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त अभियंता दिन साजरा करताना केले.
पुढे पाटील म्हणाले की, मिरा भाईंदर महानगरपालिका ज्या सेवा-सुविधा नागरिकांना पुरविते त्यापैकी 80 टक्के सुविधा अभियांत्रिकी विभागाशी संबंधित असतात. त्यामुळे एकप्रकारे नागरिकांच्या अपेक्षांची पुर्ती अभियांत्रिकी विभागामार्फत होत असून अभियंत्यांनी आजवर केलेल्या कामांमुळे मिरा भाईंदरच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडलेली असून अभियंता दिन म्हणजे केलेल्या कामांचा आढावा घेऊन आगामी वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी महत्वाचा दिवस असल्याचे मत मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी व्यक्त केले. सभागृह नेते यांच्या दालनात सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त अभियंता दिन साजरा करण्यात आली  यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत होते केले. अभियंता दिन साजरा करताना एक संकल्पना नजरेसमोर ठेवण्यात यावी. यावर्षी माहिती तंत्रज्ञान युगातील अभियांत्रिकी आव्हाने ही संकल्पना नजरेसमोर ठेवण्यात आली असल्याचे सांगत शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी यापुढील काळात स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना नागरिकांच्या सोयीसाठी अडथळा मुक्त पदपथ उपलब्ध करुन देण्याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्याची भूमिका त्यांनी मांडली. सध्याचे पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन शहराला मिळणाऱ्या धरणामुळे आपल्या शहराला जलसंपन्नता लाभली असली तरी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी बोलताना रोहिदास पाटील यांनी देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचा महत्वाचा वाटा असून आज बदलत्या काळानुसार माध्यम प्रगतीमुळे आव्हाने वाढली आहेत असे सांगत जे काम आपण हाती घेऊ त्याचे व्यवस्थित नियोजन करणे, कालबध्दता राखणे, उत्तम दर्जा ठेवणे आदी गोष्टींकडे काटेकोर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणे हे अधिक कठीण असते असे सांगत मिरा भाईंदर  महानगरपालिकेच्या आजवरच्या विकासात अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे व यापुढील काळात आणखी चांगल्या कामांनी हा नावलौकीक उंचावेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शहर अभियंता शिवाजी बारकुंड, उप अभियंता शरद नानेगांवकर, कनिष्ठ अभियंता श्रीकांत मोहिते तसेच आदी अभियंते उपस्थित होते.