आ.रवि राणा यांच्यावरील हल्ल्याचा गोंदियात निषेध

0
11
युवा स्वाभीमानच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून केला निषेध
गोंदिया,दि.24-  नागपूर येथील वाडी परिसरात आ.रवि राणा यांच्या कारच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी हल्लेखोरांनी दगडाने काचा फोडल्या. या घटनेचा निषेध म्हणून युवा स्वाभीमान गोंदिया जिल्हाच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या नेतृत्वात आज २४ सप्टेंबर रोजी शहरातील जयस्तंभ चौकात उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून शिवसेनाविरोधी नारेबाजी केली.
आमदार रवि राणा मुंबईवरून नागपूर विमानतळावर येणार असल्याने त्यांना घेण्यासाठी त्यांचे खासगी साहाय्यक युवा स्वाभीमानच्या कार्यकर्त्यांसह गेले होते. परत अमरावतीकडे आ.रवि राणा यांना घेवून जात असताना वाडी येथील अज्ञात दोन हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा काचा फोडून पसार झाले. याची आ.राण यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान राणा यांनी हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय  व्यक्त केला होता. तेव्हा त्यांचेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध गोंदिया जिल्हा युवा स्वाभीमानच्या कार्यकर्त्यांनी करीत शहरातील जयस्तंभ चौकात उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा व टायर जाळून या भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. यावेळी युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, महासचिव जीवन शरणागत,जगदिश रहांगडाले,मनिष गोंडाणे, कमलेश राणे, रमेश रिनायत, होमेंद्र पटले,पंकज वंजारी,तुषार गडपायले, सिद्धान्त मेश्राम,अनमोल माने, सतिष राणे,देवेंद्र डोंगरे,श्रेयश सतदेवे, शेखर गजभिये, सार्थक खोब्रागडे,सोनु भोयर,पप्पू राणे, अमित राणे, संदिप शरणागत,शुभम मेश्राम व अन्य युवा स्वाभीमानचे कार्यकर्ते उपस्थित होते.