सोलापूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी वायदंड़े,उपाध्यक्ष कुंभार

0
14
 सोलापूर,दि.05 – राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसींना संघटित करण्यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील मैत्रांगण बहूऊदेशिय संस्थेच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय राजकीय समन्वयक माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पर्यटन कला महोत्सवाचे निमंत्रक ऊमाजी बिसेन होते .कार्यक्रमाला कलाकार संघाचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे ,गडहिंग्लज तालुकाध्यक्ष राम कुंभार,अशोक पाटील तसेच मैत्रांगणसह इतर समाजबांधव उपस्थित होते.या बैठकीत सोलापूर जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जयवंतराव वायदंडे यांची तर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी अनिता पाटी व जिल्हाउपाध्यक्षपदी राम कुंभार यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक माजी खासदार डॉ.खुशालचंद्र बोपचे  यांनी ओबीसी महासंघाच्या ध्येयधोरणासोबतच उद्दिष्ठे काय याची माहिती दिली.सोबतच केंद्रामध्ये ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय का असावे याचे विवेचन करतांनाच ओबीसी समाजावर क्रिमीलेअरची लादलेली असैविधानीक अट आपल्या विकासाला बाधा निर्माण करण्यासाठी लादण्यात आलेली असल्याने ती रद्द करण्यासाठी ओबीसी महासंघाचा लढा सुरू असल्याची माहिती दिली. महासंघ ओबीसी कर्मचार्याना पदोन्नती मध्ये आरक्षण द्यावे ,ओबीसीसाठी विधानसभा आणि लोकसभेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करावे ईत्यादी मागण़्यांचा शासनाकडे पाठपुरावा आंदोनल व महाधिवेशनाच्या माध्यमातून सातत्याने करीत आहे. संघटना ही कोणत्याही एका जातीची नसून महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये मोडणार्या सर्व जातीसांठी आहे.त्यापैकी बहुतांश वर्ग हा आपला खेड्यापाड्यात राहणारा शेतीवर अवलंबून असणारा असल्याने त्या पेंशन मिळावी यासाठी सुध्दा राष्ट्रीय ओबीसी महासंघ लढा देत असल्याचे स्पष्ट करीत सरकारने सरसकट कर्जमाफीची भूमिका घ्यायला हवे असे स्पष्ट विचार व्यक्त केले. ओबीसी महासंघ बहूजन समाजाच्या विकासासाठी सातत्याने काम करीत समाजाच्या संविधानीक अधिकारासाठी नेहमीच संघर्षाच्या तयारीत असल्याचे सांगितले.सोबतच भारतरत्न डाॅं. बाबासाहेब आबेंडकरांच्या विषयी गैरसमज करून घेऊ नये कारण त्यांनी सगळ्यात अगोदर 340 कलम हे ओबीसीसाठी लिहीले हे आपण सर्वांनी समजून घेणे अगत्याचे झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. आभार कलाकार संघाचे शहरअध्यक्ष तोडकर यांनी केले .