घरासारखेच आपले कार्यालय स्वच्छ ठेवा-मुकाअ ठाकरे

0
14

गोंदिया,दि.05 :- दिवसभरातील आपल्या वेळेतील सर्वाधिक काळ आपण कार्यालयात घालवितो.अस्वच्छतेमुळे आजार बळावतातच शिवाय कामातील चैतन्य सुद्धा नष्ट होते.त्यामुळे आपल्या घरासारखेच आपले कार्यालय सुद्धा स्वच्छ ठेवा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.खर्रा,गुटखा आरोग्यास हानीकारक आहे. तो खाऊच नये,अशी अपेक्षा आहे परंतु ज्यांना गुटखा,खर्रा खायचा असेल,तो त्याचा वैय्नतीक प्रश्न आहे.मात्र,खर्रा,गुटखा खावून जिल्हा परिषद परिसरात भिंती रंगविणाèयांची गय केली जाणार नसल्याची ताकीदही याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच.ठाकरे यांनी दिली.

स्वच्छता मोहिमेच्या सुरवातीलाच जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी उपस्थित कर्मचाèयांना स्वच्छतेची शपथ दिली.तत्पुर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगेबाबा,लालबहाद्दूर शास्त्री यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्य्रकमाचे उद्घाटन करण्यात आले.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड,पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजेश वासनिक,जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी ए.के.मडावी,राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर,जिल्हा कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे,प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके यावेळी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.यात जिल्हा परिषदेतील २३८ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. प्रास्ताविक माहिती,शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले.संचालन विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली खोब्रागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे जे.एल. खोटाले, माहिती,शिक्षण व संवाद तज्ञ राजेश उखळकर,स्वच्छता तज्ञ सूर्यकांत रहमतकर,शालेय स्वच्छता तज्ञ भागचंद रहांगडाले, समाजशास्त्र तज्ञ दिशा मेश्राम,पाणी गुणवत्ता तज्ञ मुकेश त्रिपाठी,पाणी गुणवत्ता निरीक्षक व्ही.डी.मेश्राम,मनुष्यबळ विकास तज्ञ तृप्ती साकुरे,मुल्यमापन व संनियत्रण तज्ञ विशाल मेश्राम, शोभा फटींग,महेश केंद्रे,नितीन रामटेके,टी.के.मांडारकर, एम.ए.केंद्र,यु.एच.पळसकर,रमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले.