महावितरणविरोधात जिल्हाभरात आंदोलने

0
10

अहमदनगर,दि.30 : महावितरण कंपनीने वीज पंपांची वीज तोडण्याची कारवाई सुरु केल्यानंतर जिल्हाभरात महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मागील आठवड्यात सुरु झालेल्या आंदोलनांची धार कायम असून, सोमवारीही जिल्हा आंदोलनांनी दणाणून निघाला.
जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले आदी तालुक्यांमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणविरोधात आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूर येथे राष्ट्रवादी व काँगे्रसच्या वतीने महावितरणच्या अधिका-यांना घेराव घालण्यात आला. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, सिद्धार्थ मुरकुटे, बाळासाहेब पटारे, नगरसेवक राजेंद्र पवार, केतन खोरे, लकी सेठी, अशोक बागुल आदींनी महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारला.
कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काकासाहेब तापकीर यांच्या नेतृत्वाखाली महावितणविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, शाम कानगुडे, थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे, अ‍ॅड़ सुरेश शिंदे, बाळासाहेब सपकाळ, गजेंद्र यादव, स्वप्निल तनपुरे, अण्णासाहेब मोरे, दत्ता पोटरे आदी उपस्थित होते.