25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home महाराष्ट्र संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार

0
22

मुंबई दि.30ः-  एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार आहेत. त्यापैकी या महिन्यातील चार दिवसांचा पगार कापला जाणार. तर उरलेल्या 32 दिवसांचा पगार पुढील सहा महिन्यात कापला जाणार आहे. ऐन दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतनासह अन्य मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसलं होतं. उच्च न्यायालयाने हा संप बेकायदा ठरवल्याने अखेर 96 तासांनंतर शुक्रवारी मध्यरात्री संप मागे घेण्यात आला होता.