विजेचे चालू बिल भरा आणि कनेक्शन सुरू करा- चंद्रशेखर बावनकुळे

0
15

नागपूर,दि.30: ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे बील थकीत आहे त्यांनी चालू थकित बिल भरून आपले विद्युत कनेक्शन चालू करून घ्यावे व उर्वरित थकित बिलाचे हप्ते पाडून ते अदा करावेत, अशी शेतकऱ्यांना दिलासादायक योजना राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे सोमवारी दुपारी पत्रपरिषेदत जाहीर केली. शेतकऱ्यांच्या थकित बिलासाठी तयार केलेली ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७’ या नावाची ही नवी योजना शेतकऱ्यांसाठी खरोखरीच संजीवनी ठरावी असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या नव्या योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी विजेचे बिल भरावे. चालू बिल सात दिवसांच्या आत भरलं नाही तर त्यांचं विजेचं कनेक्शन कापलं जाऊ शकतं, असा इशाराही उर्जा मंत्र्यांनी यावेळी दिला. याखेरीज शेतकऱ्यांकडे थकबाकी असलेल्या विजेच्या बिलाचे हप्ते करून देण्यात येतील आणि त्यावर दंड व्याज आकारले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी या योजनाला प्रतिसाद द्यावा व विजेचे बिल भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

या योजनेत तीस हजारांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या मूळ रकमेचे पाच समान हप्ते करण्यात आले. तर तीस हजारापेक्षा अधिक असलेल्या ग्राहकांना मूळ थकबाकीचे दहा समान हप्त्यात भरणा करावयाचा आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीज बील नोव्हेंबर 2017 पर्यंत भरून डिसेंबर 2017 पासून मुळ थकबाकीपैकी 20 टक्क्यांचा पहिला हप्ता थकबाकीदार शेतक-यांना भरावा लागेल, त्यानंतर मार्च २०१८ मध्ये 20 टक्के, जून २०१८ मध्ये 20 टक्के, सप्टेंबर २०१८ मध्ये 20 तक्के व डिसेंबर
२०१८ अखेरीस 20 टक्क्यासह पुर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे. या योजनेत सहभागी न होणाऱ्या थकबाकीदार शेतक-यांचा वीजपुरवठा खंडित केला
जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.